धक्कादायक! फलंदाजाने भर मैदानात डोक्यात बॅट घालून केला गोलंदाजाचा खून

1901

क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. अनेकदा चेंडू लागून खेळाडू जायबंदी झाल्याचे आपण पाहिले आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू फिलिप ह्यूज याचा चेंडू लागून मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वच सुन्न झाले. मात्र एका स्थानिक स्पर्धेत रागाच्या भरामध्ये फलंदाजाने डोक्यात बॅट घालून गोलंदाजाचा खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गोलंदाजाने वाईड चेंडू टाकला म्हणून ही हत्या केल्याची ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील सुजानगंज येथील बलहामाऊ या गावात घडली आहे.

एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बलहामाऊ येथे गावातील तरुण मिळून क्रिकेट खेळत असताना वाद झाला. गोलंदाज रजनीश पांडे (24) याने टाकलेला चेंडू वाईड असल्याचे आरोपी फलंदाज अंबुज मिश्राने म्हटले. या क्षुल्लक घटनेवरून दोघांमध्ये वाद झाला. हा एवढा टोकाला गेला की अंबुजने रजनीशच्या डोक्याच बॅट घातली. यामुळे तो जाग्यावरच कोसळला.

मैदानावरील इतर खेळाडूंनी रजनीशच्या घरच्यांना याबाबत माहिती कळवली. यानंतर त्याला प्रतापगड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला प्रयागराजला जाण्यास सांगितले. परंतु वाटेतच रजनीशने प्राण सोडला मृत्यू झाला.

दरम्यान, अंबुजवर या प्रकरणी भा.द.वि. 304 अ (निष्काळजीपणाने हत्या करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण बलहामाऊ परिसरात खळबळ उडाली असून. पोलीस सध्या आरोपी अंबुज याचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या