वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनचे पुनरागमन

16

सामना ऑनलाईन । मुंबई

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. वर्ल्डकपमध्ये दुखापतीमुळे बाहेर गेलेला शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच विराट कोहली याचे कर्णधार पद जाणार की राहणार यावरून चर्चा सुरू असतानाच बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पुन्हा एकदा कर्णधार म्हणून विराटची निवड केली आहे. विराट T-20, एकदिवसीय, कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटसाठी कर्णधार असणार आहे. वेस्ट इंड़िज दौऱ्यासाठी राहुल चहल, मनीष पांडे, कृणाल पांड्या, वृद्धीमान सहा, खलील अहमद, नवदीप सिंह, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी यांना संधी देण्यात आली आहे.

T-20 साठी संघ –  विराट कोहली (कर्णधार),  शिखर धवन, रोहीत शर्मा (उपकर्णधार) के.एल.राहुल, मनीष पांडे, कृणाल पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर,  वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दीपक चहर

एकदिवसीय संघ – विराट कोहली (कर्णधार),  शिखर धवन, रोहीत शर्मा (उपकर्णधार) के.एल.राहुल, मनीष पांडे, यझुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, राहुल चहर,  वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दीपक चहर

कसोटी संघ – मयंक अगरवाल,  के. एल.राहुल चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहीत शर्मा, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, आर. जाडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर यादव