आफ्रिका दौऱ्यासाठी हिंदुस्थानचा एकदिवसीय संघ जाहीर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा संघ श्रीलंकेसोबत टी-२० सामन्यांची मालिका संपल्यानंतर पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच मुंबईकर रहाणेलाही संघात स्थान देण्यात आले आहे. लंकेविरुद्ध चांगली कामगिरी करणारा लोकेश राहुल, सिक्सर किंग युवराज सिंह आणि मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू सुरेश रैना यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. फिरकीपटू आर. आश्विन आणि रवींद्र जाडेजालाही संघात स्थान मिळालेले नाही. या दोघांच्या जागी निवड समितीने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीवर विश्वास दाखवला आहे.

पुढील वर्षी ५ जानेवारीपासून हिंदुस्थानच्या संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होणार आहे. या दाऱ्यात हिंदुस्थानचा संघ ३ कसोटी, ६ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

हिंदुस्थानी संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी.

आपली प्रतिक्रिया द्या