बीसीसीआयच्या नव्या करारात जाडेजा, पुजाराला बढती; तर रोहित शर्माची गच्छंती

17
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी क्रिकेटपटूंची वार्षिक करारबद्द यादी बीसीसीआयनं जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या ‘अ’ श्रेणीमध्ये क्रिकेटपटूंमध्ये चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजयचा समावेश करण्यात आला आहे. तर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या रवींद्र जाडेजाला बढती देण्यात आली आहे. जाडेजाचा ‘ब’ श्रेणीतून ‘अ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. युवराज सिंहला ‘ब’ श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे, तर रोहित शर्माला मात्र ‘अ’ श्रेणीतू डच्चू देत ‘ब’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. मात्र गौतम गंभीर, हरभजन सिंह आणि दिनेश कार्तीकचा या यादीसाठी विचार करण्यात आलेला नाही.
बीसीसीआय ‘अ’ श्रेणीमध्ये असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वर्षाला २ कोटी रुपये, तर ‘ब’ श्रेणीमध्ये असणाऱ्या खेळाडूला वर्षाला १ कोटी रुपये मानधन देण्यात येते. तसंच १ ऑक्टोबर २०१६ पासून कसोटी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूा एका कसोटीसाठी १५ लाख, वनडेसाठी ६ लाख आणि टी-२० खेळण्यासाठी ३ लाख रुपये मानधन देते.
‘अ’ श्रेणीतील खेळाडू (प्रत्येक वर्षाला 2 करोड) – विराट कोहली (कर्णधार), एम.एस. धोनी, आर. अश्विन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जाडेजा, मुरली विजय.
‘ब’ श्रेणीतील खेळाडू (प्रत्येक वर्षाला 1 करोड)– रोहित शर्मा, के.एल. राहूल, भूवनेश्वर कुमार, मोहमद्द शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वृद्धमान साहा, बुमराह, युवराज सिंग.
‘क’ श्रेणीतील खेळाडू (प्रत्येक वर्षाला 50 लाख) – शिखर धवन, रायडू, अमित मिश्रा, मनिष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, हार्दिक पांड्या, आशिष नेहरा, यजुवेंद्र चहल, पार्थिव पटेल, जयंत यादव, मनदिप सिंग, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर, ऋषभ पंत.
आपली प्रतिक्रिया द्या