टीम इंडियाला मिळणार नवीन कोच? बीसीसीआयने मागवले अर्ज

52
ravi-shastri-bcci

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियात मोठे बदल होणार अशी चर्चा सुरू असतानाच आता बीसीसीआयने प्रशिक्षक (कोच) पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत ‘टीम इंडिया’चे आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघातील गटबाजी चव्हाट्यावर आली. त्यामुळे टीम इंडियात संघ आणि संघ व्यपस्थापन अशा दोन्ही भागात बदल होण्याच्या शक्यता बोलल्या जात आहेत.

टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकासह बँटिंग कोच, बोलिंग कोच, फिल्डिंग कोच, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंग्थ आणि कंडिशनींग कोच आणि प्रशासकीय व्यवस्थापक (अॅडमिनिस्ट्रेटीव्ह मॅनजर) अशा पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला नवीन कोच मिळण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या