सचिन तेंडुलकरला बीसीसीआयचा जोरदार झटका!

12

सामना ऑनलाईन । मुंबई

भारतरत्न सचिन तेंडुलकरला जोरदार धक्का बसला आहे. हा धक्का त्याचा कोणी दिला हे ऐकून तुम्हाला डबल धक्का बसेल. हा धक्का त्याला दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर बीसीसीआयनं दिला आहे.
सचिनच्या जीवनावर आधारित ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ सिनेमाच्या निर्मितीचं काम सुरू आहे. या सिनेमाच्या प्रोडक्शन कंपनीने सचिनच्या कारकिर्दितले काही महत्त्वाचे व्हिडिओ बीसीसीआयकडे सवलतीच्या दरात मागितले होते. मात्र बीसीसीआयने सचिनचे व्हिडिओ सवलतीच्या दरात या कंपनीला देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

सचिनच्या वानखेडे मैदानातील शेवटच्या सामन्यातील भाषण मोफत देण्याचं मात्र बीसीसीआयनं मान्य केलं आहे. बीसीसीयच्या वतीने सचिनने खेळलेल्या सगळ्या सामन्यांच्या व्हिडियोचे कॉपीराईट्स बीसीसीआयकडे आहेत. व्यावसायिक वापरासाठी ते व्हिडिओ खरेदी करावे लागतात. याआधी महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित आलेल्या सिनेमासाठी धोनीचे व्हिडिओ जवळपास १ कोटी रुपयांना विकले होते. व्हि़डिओ खरेदीसंदर्भात बीसीसीआयचं एक रेटकार्ड आहे, त्यानुसार या व्हि़डिओंची विक्री होते. धोनीच्या सिनेमासाठी दिलेल्या व्हिडिओसाठी कोणतीही सूट दिली नव्हती, त्यामुळे सचिनच्या व्हिडिओसाठीही सूट देता येणार नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या