…तर बीसीसीआयने स्वत:चे विमान खरेदी करावे – कपिल देव

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी बीसीसीआयला खेळाडूंच्या विश्रांतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. शास्त्रींच्या सल्ल्यानंतर हिंदुस्थानचे माजी खेळाडू आणि कर्णधार कपिल देव यांनीही बीसीसीआयला खेळाडूंना जास्तीत जास्त विश्रांती मिळावी यासाठी एक स्वतंत्र विमान घेण्याचा सल्ला दिला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना कपिल देव यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘खेळाडूंच्या विश्रांतीकडेही लक्ष द्या’, शास्त्रींचा बीसीसीआयला सल्ला

बीसीसीआय क्रिकेटमध्ये भरपूर पैसा कमावत आहे. त्यामुळे बीसीसीआय स्वतंत्र विमान सहज खरेदी करू शकते. खेळाडूंसाठी बीसीसीआयने खासगी विमान खरेदी करावे. स्वतंत्र विमानामुळे खेळाडूंचा वेळही वाचेल आणि त्यांना विश्रांतीही भरपूर मिळेल. तसेच बीसीसीआयने याआधीच याबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असेही कपिल देव म्हणाले.

अमेरिकेच्या गोल्फ खेळाडूकडे स्वत:चे विमान आहे. येत्या काही वर्षांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूही स्वतंत्र विमान खरेदी करू शकतात. बीसीसीआय त्यासाठी पार्किंगचे पैसे देण्याची तयारी दाखवण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे कपिल देव म्हणाले. बीसीसीआयने ३० ते ४० लोक बसतील असे विमान खरेदी केल्यास काही लोकांनी नोकरीची संधीही उपलब्ध होईल, असे कपिल देव म्हणाले. तसेच १०० प्रवासी बसतील एवढ्या ए-३१८ विमानाची किंमत ५०० कोटी आहे आणि हा खर्च बीसीसीआय सहजपणे करू शकते, असेही कपिल देव म्हणाले.

याआधी एकामागोमाग होणारे आंतरराष्ट्रीय सामने, विमान प्रवासामुळे खेळाडू लवकर थकत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक बनवताना खेळाडूंच्या विश्रांतीकडेही लक्ष द्यावे, असे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या