फायनलआधी महिला खेळाडू मालामाल, ५० लाखांचे बक्षिस जाहीर

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या महिला संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत केलेल्या अप्रतिम कामगिरीसाठी बीसीसीआयने संघातील प्रत्येक सदस्याला तसेच सपोर्ट स्टाफला बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात सहा वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला घरचा रस्ता दाखवणाऱ्या खेलाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी ५०-५० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. तसेच सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना प्रत्येकी २५-२५ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे.

उपांत्यफेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने ११५ चेंडूचा सामना करत २० चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १७१ धावा केल्या होत्या. तर कर्णधारी मिताली राजने विश्वचषकामध्ये उपांत्यफेरीपर्यंत ३ अर्धशतक आणि १ शतक झळकावले आहे. तसेच इतर फलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजीतही गोस्वामी, शर्मा, गायकवाड, बिश्त आणि पांडेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थान २००५ नंतर पहिल्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करत हिंदुस्थानला पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या