बदलांसाठी रहा तयार! उद्यापासून रेल्वे वेळापत्रक, गॅसचे दर, एटीएमच्या वापरात बदलाची शक्यता

atm-lpg-cng

डिसेंबर महिन्यापासून दैनंदिन जीवनात वापरात असणाऱ्या गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. एटीएमचा वापर, डिजीटल रुपी, सीएनजी-पीएनजी दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे तुमच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पेन्शनधारकांनासाठी आजचा दिवस महत्त्वाचा

पेन्शन घेणाऱ्यांना हयातीत असल्याचा दाखला सादर करावा लागतो. त्यासाठी शेवटची मुदत 30 नोव्हेंबर 2022 होती. या मुदतीत तुम्ही हयातीत असल्याचा दाखल सादर न केल्यास एक डिसेंबरपासून पेन्शन मिळवण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

रेल्वे वेळापत्रकात बदल होणार

डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढतो आणि धुक्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होतो. काही रेल्वे गाड्या रद्द होतात. डिसेंबर महिन्यात काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाआधी वेळापत्रकातील बदलांवर लक्षं देणं महत्त्वाचं आहे.

LPG सिलिंडर दर

एलपीजी गॅस कंपन्यांकडून दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात येतो. त्यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल दिसून येऊ शकतो. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेता एक डिसेंबर रोजी एलपीजी गॅसच्या दरात काही बदल होणार का याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

सीएनजी-पीएनजी दरातही बदलाची शक्यता

अनेकदा दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरात बदल केले जातात. गेल्या काही दिवसात सीएनजीचे दर वाढत असल्याचे पाहायला मिळाले आहेत. अशात उद्या सीएनजी दरात बदल होणार का, याकडे लोकांचं लक्ष आहे.

ATM मधून पैसे काढण्याआधी येणार ओटीपी

एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. एटीएममधून रक्कम काढताना होणारी फसवणूक टाळण्याच्यादृष्टीने पंजाब नॅशनल बँकेकडून एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल होण्याची शक्याता आहे. यामध्ये मोबाईलवर ओटीपी येईल, त्यानंतर ग्राहकांना पैसे काढता येतील.

डिजीटल रुपया

आरबीआयने 1 डिसेंबरपासून रिटेलसाठी डिजिटल रुपया लाँच करण्याची घोषणा केली असून किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला प्रयोग असेल. या दरम्यान, ई-रुपयाचे वितरण आणि वापरासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

13 दिवस बँकांना सुट्टी

डिसेंबर महिन्यात तुमची बँकेशी निगडित काही कामे असतील तर बँकांच्या ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करा. कारण डिसेंबर महिन्यात बँकांना 13 दिवस सुट्टी आहे. अर्थात प्रत्येक राज्यानुसार त्यात काही बदल असेल.