नारळ… समुद्र आणि मासे

733

शेफ निलेश लिमये

परवा नारळी पौर्णिमाया ना त्या कारणाने आपण समुद्राशी अगदी घट्टपणे जोडला गेलो आहोतभावनिकभुकेच्या आणि चवीच्या अगदी शारीरिकसुद्धानारळ आणि मासे समुद्राचे अभिन्न जीवलगश्रीफळ आपल्या संपूर्ण जगण्याचीच लज्जत वाढवतो तर अगदी ऐन श्रावणातही अस्सल मत्स्यप्रेमी दुर्मिळ मत्स्याहाराचा आस्वाद घेत असतात

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?’, ‘माडाच्या बनात ये ना’… अशी अनेक गाणी उगीच लोकप्रिय झाली नाहीत. पण नारळी पौर्णिमा जवळ आली की चाहूल लागते ती चाकरमान्यांची गावाला येऊन जत्रेला सहभागी होण्याची… उत्सवात सामील होण्याची आणि अर्थात नारळी पौर्णिमेच्या महत्त्वाच्या दिवसाची… याच दिवशी आपले कोळीबांधव एक दीड महिन्याच्या सुट्टीनंतर त्यांची नाव मासेमारीसाठी समुद्रात सोडतात. ही पद्धत आपल्याकडे पूर्वीपासून रूढ आहे.

या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण निसर्गाला त्याने आपल्याला दिलेला अथांग आपण प्रार्थना करू की हा समतोल असाच ठेवावा. अजून पुढची अनेक शतकं… कारण याचे जे समीकरण आहे, नारळ, फिश आणि समुद्र… हे तिन्ही लोकांत एक अप्रतिम अशी निसर्गाची देणगी आहे. जेव्हा निसर्ग देतो तेव्हा भरभरून देतो. पण त्याचा उच्छादपणा आपण मांडू नये ही खबरदारी घेणं आवश्यक आहे.

थांबा… किचनमध्ये आता झकासपैकी एक नवीन डीश क्रिएट करतोय. ती आधी चाखतो आणि मला आवडली तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करतो… आणि बॅकग्राऊंडला आमचा स्टाफही उत्स्फूर्त झाला आहे. आता किचनमध्येच आमची पार्टी होणार… ‘गोमू संगतीनं’ हे कोळीगीत ऐकत आमच्या पुढच्या फेस्टीवलची तयारी करणार!

मासे ते मासेच…

समुद्रावर प्रेम असणाऱयांचे, समुद्र सान्निध्य लाभलेल्यांचे मुख्य अन्न मासे. गटारी अमावस्या अत्यंत जोशात साजरी करूनही अस्सल मत्स्यप्रेमी श्रावणाची आतुरतेने वाट पाहात असतात. कारण एरव्ही वर्षभर पहायलाही न मिळणारे मासे या दिवसात मुबलक मिळतात. गाभोळी तर श्रावणातच मिळणार. कशीही खावी. तेलात तळून, कांदा-टोमॅटोवर परतून. याखेरीज कालवं, शिंपले हेदेखील याच मोसमात येणारे. कालवं हा प्रकार खास कोकण किनारपट्टीचा. समुद्राच्या भरतीबरोबर येऊन खडकाच्या सांदेकपारीतून त्यांना हुडकून काढणं हे खऱया अर्थानं कौशल्याचं काम. मासा जेवढा लहान तितकाच तो चवीला अस्सल. हे मत्स्यप्रेम महाराष्ट्राबाहेर नेलं तेही आपल्या कोकणी, मराठी माणसानेच. उसळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारल अर्पण करीत आपले कोळी बांधव हा मत्स्य खजिना ऐन श्रावणात लुटायला सज्ज होतात… आणि आपल्याला नाही बुवा श्रावण पाळायला जमत. म्हणून मत्स्यस्वाद घेण्यास सज्ज होतो अस्सल मत्स्यप्रेमी.

टोमॅटो कोकोनट सूप

टोमॅटोचे सूप बनवायचे. त्यात टोमॅटो, कांदा, लसूण, आले वाफवून त्याची पेस्ट करायची. पेस्ट गाळून घ्यायची. त्यात नारळाचे दूध घालून ते सूप सर्व्ह करायचे. टोमॅटोचा आंबटपणा, खोबऱयाचा गोडपणा आणि एक छान अशा गरम वाफाळलेल्या सूपचा झुरका तुम्हाला ताजेतवाने करू शकेल.

प्रॉन्स मांगा करी

प्रॉन्स मांगा करी म्हणजे प्रॉन्स, कैरी यांची करी. यासाठी मी वापरलंय १ वाटी खोबरे, आलं-लसूण, हिरवी मिरची, धणे-जिरे, पण यामध्ये चिंच किंवा कोकम न वापरता कैरीचा गर वापरला आहे. जे मी कच्ची कैरी वाफवून घेतली आणि त्याचा गर काढला. दोन ते तीन चमचे गर खोबऱयासोबत मिक्स करून त्याचं कालवण तयार केलं. प्रॉन्स तेलात मस्त परतून घेतले. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता, जिरं-मोहरीचा तडका दिला. त्यात प्रॉन्स घातले. परतवून घेतले. त्याचा रंग छान गुलाबी झाला तेव्हा त्यात मी दोन ते तीन चमचे कालवणाची पेस्ट घातली आणि प्रॉन्स मस्त टॉस करून घेतले. त्या आंबट गोड कैरीच्या गराची चव प्रॉन्समध्येही उतरली आणि कढीपत्त्याचा खमंगपणा प्रत्येक करीमध्ये आला.

मस्त समुद्रकिनारा

समुद्रकिनारा जगभरातील कुठल्याही देशाचा असला तरी त्या देशाचं एक वेगळंच स्थान होतं. लंडन बघा, मुंबई, कराची ते थायलंड, मॉरिशस, बार्बेडॉस किंवा जमेका… किंवा अगदी वेस्ट इंडीज असो, या सगळ्या देशांचं, त्या त्या शहरांचं वैशिष्टय़ म्हणजे तिथला समुद्रकिनारा… अथांग समुद्र, निळंशार पाणी, लांबलचक बीचेस, त्या समुद्रकिनाऱयावर अभिमानाने डोलणारी माडाची बने… हे निसर्गमय दृष्य दिसतेच, पण समुद्र, नारळ आणि मासे हे समीकरण अगदी त्रिकुटासारखं… प्रसिद्ध आहे. मी खरोखरच धन्य आहे की मला हे क्षेत्र निवडलं… स्वयंपाकाचं.. कारण यामुळे मला जगभर फिरायला मिळतं. वेगवेगळ्या देशांच्या चालीरिती बघायला मिळतात. आणि त्यातून घडलेली त्यांची खाद्यसंस्कृती समोर येते. मॉरिशसचं क्रिओल फ्रिजींग म्हणा, यात थोडय़ाशा हिंदुस्थानी पद्धतीच्या करीज, फ्रेंज खाद्यसंस्कृतीचे टेक्नीक आणि स्थानिक खाद्यपदार्थ.. या तिन्हीचं एक अप्रतिम असं भोजन तयार होतं. नुसतंच मॉरिशस नाही तर वेस्ट इंडीजमधले शिंपल्यांचे सूप… नॉर्थ अमेरिकेचे कच्ची कालवं खाण्याची पद्धत, जी तेथेच कालव्याचं शिंपलं उघडून त्यावर थोडं मीठ व लिंबाचा रस पिळून ते गिळून टाकायचं… ही पद्धत, तेथून ग्रीसला आल्यास मेडिटरेनियन किनारपट्टा म्हणजेच त्यांच्या पाश्तामध्ये स्टफ केलेलं किंवा मिक्स केलेलं त्यांचं मारिनारा सॉस… हाच सॉस जर पिझ्झावर पसरला, थोडं ऑलिव्ह ऑईल शिंपडलं, ताजे प्रॉन्ज त्यावर मांडले, व चीज घालून बेक केलं तर अप्रतिम अशा पिझ्झा मारिनाराच्या स्वादाने तुम्ही बेहाल होऊन जाल. मग भले जगातून तुम्ही कुठूनही आलेले असाल तरीही या चवीच्या स्वादाने तुम्ही दोन-चार पिझ्झा तरी नक्की खाणार.

 

आपली प्रतिक्रिया द्या