सहा महिन्यांनंतर समोर आला ओमर अब्दुल्लांचा फोटो, ओळखणेही झाले कठिण

1764
omar-abdullah

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील अनेक नेत्यांना व फुटिरतावाद्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री व पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्याच घऱात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या सहा महिन्यात या तीनही बड्या नेत्यांबाबत कोणतेही वृत्त आलेले नाही ना यांची झलक त्यांच्या समर्थकांना पाहायला मिळाली आहे

omar-abdulah-beard-1

मात्र तब्बल 173 दिवसांनी ओमर अब्दुल्ला यांचा एक फोटो समोर आला आहे. या फोटो त्यांना अक्षरश: ओळखणही कठिण आहे. त्यांनी दाढी व मिशी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यांच्या तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. दरम्यान अब्दुल्ला यांच्या जवळच्या नातेवाईकांनी जोपर्यंत त्यांची नजरकैदेत सुटका होणार नाही तोपर्यंत ते दाढी करणार नसल्याचा पण केल्याचे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या