तजेलदार दिसा…

चेहरा तजेलदार दिसण्यासाठी बरेच जण विविध फेस वॉश किंवा साबण वापरतात…काही वेळा या उत्पादनांमुळे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते…मात्र वाढत्या वयानुसार घरगुती पदार्थांचा सौंदर्यवाढीसाठी वापर केला तर…उत्साह वाढतोच शिवाय अ‍ॅलर्जी आणि साईड इफेक्टपासून दूर राहता येते.

मध, लिंबू आणि मलाईची पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्याला मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.

थोडीशी हळद आणि चंदन पावडरमध्ये दूध मिसळून तयार केलेल्या पेस्टने चेहऱ्याला २ ते ३ मिनिटे मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्याचा ग्लो वाढेल.

एका छोट्या टोमॅटोची पेस्ट बनवा. त्यामध्ये एका लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बेसन घाला. हा मास्क २० मिनिटे चेहरा, मानेला लावा.

रात्री २ किंवा ३ बदाम दुधात भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा धुवा.

एक चमचा कोरफडीचा गर चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

एक चमचा गुलाब पाणी आणि दूध एकत्र करा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा.

पिकलेले केळे दुधात कुस्करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

३ चमचे लिंबाच्या रसात एक चमचा हळद पावडर मिसळून पेस्ट करा. चेहऱ्याला लावल्यानंतर ३० मिनिटांनी चेहरा धुवा.

एक चमचा हळदीमध्ये दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

एक चमचा साखरेत अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करा. या मिश्रणाने चेहऱ्याला हलक्या हाताने ५ किंवा १० मिनिटे स्क्रब करा.