बीडमध्ये खळबळ, 28 पोलीस तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात

11760

निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी जमातमधील आठ कोरोनाग्रस्तांना रुग्ण लातूरकडे जाणाऱ्या बीडच्या चेक पोस्टवर अडवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांनी बीड पोलिसांशी हुज्जत घातली होती. आता चेक पोस्टवर कर्तव्यात असलेल्या 15 अन चौसाळा चेक पोस्ट वरील 13 पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने तपासणी केली जात आहे. त्यांना बीड च्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मरकजमध्ये सहभागी झालेल्या तबलिगी जमातमधील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लातूर मध्ये स्पष्ट झाले. हे कोरोनाग्रस्त जालण्याहून लातूर कडे रवाना होत असताना त्या रात्री शहागडच्या चेक पोस्टवर बीडच्या पोलिसांनी त्यांना अडवले. जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली. बीड चे पोलीस लातूरकडे जाऊ देत नसल्याने त्यांनी चेक पोस्ट वर पोलिसांशी हुज्जत घातली तरी ही पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही अखेर त्यांनी शहागडमध्ये दर्ग्याचा आधार घेत रात्र काढली. आणि पहाटे पोलिसांची नजर चुकवून ज्या रस्त्यावर चेक पोस्ट नाही अशा नागझरी मार्गे जात लातूर गाठले. मात्र शहागड मध्ये ज्याच्या सोबत या आठ जणांनी जेवण घेतले त्या 26 जणांना जालना येथे तपासणी साठी घेऊन गेले आहेत. आता बीडच्या चेक पोस्ट वर 15 पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे या पोलिसांची आता तातडीने बीड मध्ये तपासणी केली जात आहे. तसेच बीड च्या पुढे चौसाळा चेक पोस्ट वर डुप्लिकेट पास दाखवून त्यांनी लातूर जिल्ह्यात प्रवेश केला त्या वेळी चेक पोस्टवर असणाऱ्या 13 अशा 28 पोलिसांची बीड रुग्णालयात तपासणी केली जात आहे,

त्यांचा मुक्काम बीड मधेच होता
तबलिगी जमाती मधील त्या आठ जणांनी जालण्याहून लातूर कडे जाताना आपला मुक्काम बीड मध्ये नियोजित केला होता, ते रात्रभर बीड मध्ये थांबणार होते, रात्रीचे जेवण ही बीड मधेच घेणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले, जिल्ह्यात प्रवेश करू दिला नाही अखेर त्यांनी पहाटे, दुसऱ्या मार्गे चौसाला चेक पोस्ट गाठत लातूर गाठले म्हणून बीड चा मुक्काम टळला

आपली प्रतिक्रिया द्या