बीड : मनोरुग्णाला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला, रोख रकमेचे बक्षिस देऊन पोलीस शिपायाचा गौरव

732
फोटो- बीड शहर

बीड शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या कंपाऊंडवरून आत शिरण्याचा एका मनोरुग्णाने प्रयत्न केला. मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळण्यास मदत झाली.  महेंद्र ओव्हाळ असं या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्यांनी मनोरुग्णाच्या कृतीमुळे काय परिणाम होऊ शकतात याचे  गांभीर्य ओळखले. त्यांनी या इसमास खाली खेचून ताब्यात घेतले. ही कामगिरी अत्यंत महत्वाची ठरली असून मोठा अनर्थ टळला आहे. ओव्हाळ यांच्या या कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यांचा पाच हजार रूपयांचे बक्षीस देऊन गौरव केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या