बीड : तळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू

92

सामना प्रतिनिधी । बीड

बीड तालुक्यातील सात्रा पोत्रा तळ्यात बुडून संख्ख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील सात्रा पोत्रा येथील बहीण भावाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. रंजना राजेंद्र पवार (८) आणि सुरज राजेंद्र पवार (११) वर्ष ही मृत बहीण-भावाची नावं आहेत. राम नगर येथील तळ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दोघांची मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आली असून शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या