बीडमध्ये एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून मौलाना बलात्कार करत असल्याची संतापजनक घडना समोर आली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशीय या नराधम मौलानावर पेठ बीड पोलीस स्थानकामध्ये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रियाज शेख असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत गजाआड केले आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोमीनपुरा भागात राहणारा मौलाना रियाज शेख हा त्याच्या राहत्या घरी उर्दू आणि अरबी भाषेची शिकवणी घेत होता. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकवणीची वेळ वेगवेगळी होती. याचाच गैरफायदा घेत आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून 11 वर्षाच्या मुलीवर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार करत होता. याची कानकून लागताच पीडितेच्या कुटुंबियांनी धक्का बसला. कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली.
पत्नी व मुलं घरी नसताना आरोपीने दुष्कर्म केला. आरोपीने नैसर्गिक आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याची तक्रार पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.