बीड जिल्ह्यात आज 159 कोरोना पॉझिटिव्ह सापडले

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे. आज दुपारी आलेल्या अहवालात १५९ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोनाबाधितांचा एकुण आकडा ८३२९ वर जावून पोहचला आहे. सर्वाधिक रूग्ण बीड तालुक्यात सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा सातत्याने वाढत आहे. आज १०७९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ९२० जण कारोना निगेटिव्ह आले तर १५९ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यात बीड तालुक्यातील ४३, अंबाजोगाई २३, आष्टी  १०, धारूर ११, गेवराई ८, केज १९, माजलगाव १६, परळी १८, पाटोदा ३, शिरूर २, वडवणीमध्ये ६ रूग्ण सापडले आहेत. सध्या बीड जिल्ह्यामध्ये विविध कोव्हिड सेंटरमध्ये २७०९ जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५२३२ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर ६४.४ टक्के एवढा आहे. रविवारी ११७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत २२९ जणांचा मृत्यू झाला.

१०६० बेड रिक्त
बीड जिल्ह्यात रविवारी घेतलेल्या आढावामध्ये विविध कोव्हिड सेंटरमध्ये एकुण १८५० बेड आहेत. त्यात ७९० रूग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन असलेले बेड ७७०, व्हेंटिलेटरचे बेड १२४, सामान्य बेड १६६ असे १०६० बेड सध्या रिक्त आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या