बीडच्या ‘आयएमए’कडून पूरग्रस्तांना साडेचार लाखांची औषधे

546

सामना प्रतिनिधी, बीड

कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून बीडच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने साडेचार लाख रुपयांची औषधे दिले आहेत. मंगळवारी सकाळीच औषधांनी भरलेली गाडी कोल्हापूरला रवाना झाली आहे.

सांगली, कोल्हापूर येथे पुर आल्यानंतर बीड जिल्ह्यातून साहित्य, धान्य व इतर साहित्याच्या माध्यमातून मदत करण्यात आली. यासाठी हजारो हात पुढे सरसावले होते. हाच धागा पकडून बीडच्या आयएमए संघटनेनेही पुढाकार घेतला. कोल्हापूर आयएमएकडून औषधांची मागणी होताच बीडची संघटना एकत्र आली आणि अवघ्या काही तासांत साडेचार लाख रूपयांची औषधे जमा केली. जीवनावश्यक औषधांनी भरलेली गाडी मंगळवारी सकाळीच कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहे. ही मदत कोल्हापूर आएएमएकडे सुपूर्द केली जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल यांनी सांगितले. दरम्यान यातील 51 हजार रुपयांची आर्थिक मदत ही राज्य आयएमएकडे पाठविण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, आयएमए बीडचे अध्यक्ष डॉ.अनिल बारकुल, डॉ.अनुराग पांगरीकर, डॉ.विनोद ओस्तवाल, डॉ.सी.ए.गायकवाड, डॉ.अविनाश देशपांडे, डॉ.सुशांत योगे, डॉ.राजेश शिंदे, डॉ.अनंत मुळे, डॉ.सुनिता बारकुल, डॉ.डिंपल ओस्तवाल, डॉ.जयश्री घुगे, डॉ.रिता शहाणे, डॉ. प्रज्ञा तांबडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या