कारवाईचा इशारा देताच बीडमध्ये दोन मशिदीतून 24 जण तपासणीसाठी बाहेर पडल्याने खळबळ

20645
फोटो - प्रातिनिधिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मरकजहुन आलेल्या तबलीगी जमातच्या लोकांनी स्वतःहून बाहेर पडावे आणि तपासणी करून घ्यावी, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देताच बीड शहरातील दोन मशिदीतून तब्बल 24 जण तपासणीसाठी बाहेर पडल्याने खळबळ उडाली.

कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातला आहे. देशभरात दिल्लीतील मरकजहुन आलेल्या तबलीगी जमातमध्ये सहभाग असलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बीड जिल्ह्यातही तबलीगी जमातच्या लोकांना शोधण्याचे काम सुरू होते मात्र अनेक जण लपून बसले होते. त्यांच्यामुळे इतरांना कोरोना प्रसार होण्याची भीती होती म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मंगळवारी इशारा दिला होता.

मरकजहुन आलेल्या तबलीगी जमातच्या लोकांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा, समोर येऊन तपासणी करून घ्यावी. उपचार करून घ्यावा असे आवाहन केल्यानंतर बुधवारी बीडमधील दोन मशिदीतून 24 लोक स्वतःहून प्रशासनाकडे तपासणीसाठी बाहेर आले आहेत. यात एका मशिदीतून 13 अन दुसऱ्या मशिदीतून 11 लोक समोर आले आहेत. यातील 13 लोक मशिदीतून जमातचे असून जम्मू-कश्मीर येथील आहेत. ते सांगली येथून बीडमध्ये आले होते. तर 11 लोक उत्तर प्रदेशातून आलेले आहेत. ते तबलिकी जमतशी संबंधित आहेत की नाही ते समोर आले नाही. मात्र या 24 लोकांची तपासणी केली जाणार आहे. हे सर्व जण लॉकडाऊन पासून बीडमध्ये आहेत की नंतर आले याचा तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या