बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

593

बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या कर्तृत्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिर्वसिटीने वार्षिक पब्लिकेशनमध्ये हर्ष पोद्दार यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांच्या कर्तृत्वावर लेख प्रकाशित केला आहे.

विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिर्वसिटी युनायटेड किंगडम यांनी वार्षिक पब्लिकेशनमध्ये बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांच्या कामाचा चढता आलेख दाखवणारा लेख प्रकाशित केला आहे. त्यात राजकीयदृष्टया संवेदनशिल असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पोलिसांनी अत्यंत उत्कृष्टतेने हाताळल्याबद्दल विशेष कौतुक केले आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे त्या ऑक्सफर्ड युनिर्वसिटीचे विद्यार्थी आहेत. 2009 मध्ये त्यांनी या युनिर्वसिटीत मास्टर ऑफ लॉ या पदवीचे शिक्षण घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या