बीड जिल्ह्यात खळबळ, भाजपच्या ताब्यातील वैद्यनाथ बँकेच्या चेअरमनला 10 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या परळीच्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना त्यांच्या धान्य खरेदी-विक्री दुकानात सापळा रचून 10 लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात शाखा असणारी अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाणारी वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक पन्नालालजी जैन यास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दहा लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचे दोन वर्षापूर्वी सीसीचे अकाऊंट अडीच कोटी रूपये कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून जैन याने पंधरा लाख रूपयाची मागणी केली होती. प्रत्यक्षात दहा लाख रूपये स्विकारून उर्वरित पाच लाख रूपये नंतर घेण्याचे सांगून आज दहा लाख रूपये स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोलीस नाईक विजय बामंदे, सुनिल पाटील यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या