बीडमध्ये भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी; गेवराई, अंबाजोगाईत शिस्तीचे दर्शन

1702

संचारबंदी शिथील होताच बीडच्या भाजी बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. वारंवार सूचना करूनही जनतेकडून सूचनांचे पालन केले जात नसल्याने संक्रमणाच धोका आहे.

गेवराई अंबाजोगाईमध्ये खरेदी करताना शिस्त पाळली जात आहे. कोणतीही गर्दी न करता दोन जणांमध्ये चार फुटाचे अंतर ठेवले जात आहे. बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासात जीवनावश्यक वस्तू कशा संपल्या असा सवाल उपस्थित होत आहे. मंगळवारी 11 वाजता संचारबंदी शिथील करताच बीडच्या भाजी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. वाहनचालक गर्दीत घुसत होते. भाजीबाजाराचा रस्ताही जाम लागला होता. अशी गर्दी होणे चिंताजनक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या