बियर पिणाऱ्यांसाठी बातमी, वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बियर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वैज्ञानिकांच्या अभ्यासात जी लोकं मर्यादित प्रमाणात नेहमी बियर पितात त्यांना स्मृतिभ्रंश या आजाराचा त्रास कमी होऊ शकतो असा दावा त्यांच्या अभ्यासातून केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी 60 वयोगटापुढील 25 हजार लोकांच्या पिण्याच्या सवयी तपासल्या आणि त्यावर अभ्यास केला आहे.  वैज्ञानिकांनी त्यांच्या अभ्यासात पाहिले की, जी लोकं एका दिवसात 946 मिली बियर पितात. त्यांना स्मृतीभ्रंशाा त्यांना हा त्रास एक तृतियांश पेक्षा कमी होतो.

अभ्यासानुसार, बिअर न पिणाऱ्यांना सगळ्यात जास्त संकटाचा सामना करावा लागला कारण न पिणाऱ्या लोकांमध्ये पिणाऱ्या लोकांपेक्षा स्मृतिभ्रंशाचा धोका पाच पट जास्त होता. अभ्यासकांनी सांगितले की, जी लोकं मद्यपान करत नाहीत, त्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंशापासून वाचण्याचे कोणतेच लक्षण नव्हते. तर हा अभ्यास मध्यम पिणाऱ्या लोकांमध्ये सकारात्मक रिझल्ट पाहिला. मात्र जी लोकं अधिक घेतात, त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. डॉ. लुईस मेवटन आणि त्यांचे सहकाऱ्यांच्या मते, स्मृतिभ्रंशाचे जोखीम मागच्या 30 वर्षांत तीन पट झाले आहे. आधी अंदाज लावला की, स्मृतिभ्रंश होणाऱ्या कारणांनाच संपवले तर जगभरात 10 पैकी चार स्मृतिभ्रंशाचे प्रकार थांबवले जाऊ शकतात.

न्यू साऊथ वेल्स विद्यापिठाच्या चमूने पंधरा जुन्या अभ्यासातून माहिती जमवली आणि त्यामध्ये दारु पिणारे आणि स्मृतिभ्रंशापासून ग्रस्त असलेले असे 24, 478 हून अधिक लोकांची माहिती गोळा केली. या लोकांना कमी, मध्यम आणि अधिक विभागात विभागले गेले होते. यामध्ये इथेनॉल कंम्पाऊडबाबत माहिती मिळवली होती की कोणती व्यक्ती किती प्रमाणात इथेनॉल घेत आहे. उदाहणार्थ 473 मिली बियरमध्ये 16 ग्रॅम इथेनॉल असते आणि मध्यम आकाराच्या वाईनमध्ये 18 ग्रॅम इथेनॉल असतं. यामध्ये अभ्यासकांनी पाहिले की दरदिवशी 40 ग्रॅम इथेनॉल पिणे स्मृतिभ्रंशाची तक्रार कमी करु शकते. या अभ्यासात अशा लोकांना सहभागी केले होते की, ते गेल्या 40 वर्षांपासून मद्यपान करतात.

जर्नल अॅडिक्शनमध्ये सादर केलेल्या निष्कर्षावरुन,  2, 124 लोकांना स्मृतिभ्रंशाचा त्रास होत होता. प्रमाणापेक्षा जास्त बिअर पिणाऱ्या लोकांपेक्षा स्मृतिभ्रंशा होण्याची संभावना 22 पटीने कमी होती आणि जी लोकं दिवसभरात 1.18लीटर एवढी पितात, त्यामध्ये मद्यपान न करणाऱ्या लोकांपेक्षा स्मृतिभ्रंशाचा धोका 38 पटीने कमी आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूमध्ये प्लेक तयार होण्यास प्रतिबंध होतो, जे अनेक रोगांचे कारण आहे. जे अजिबात मद्यपान करत नाहीत त्यांच्या तुलनेत अधिक मद्यपान करणाऱ्यांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचा धोका 19 पटीने कमी होतो.

वैज्ञानिकांनी सांगितले की मध्यम प्रमाणात अल्कोहोलच्या सेवनाने कोलेस्ट्रोल वाढतो. त्यांनी याबाबत सांगितले की, संशोधनात जी माहिती गोळा केली होती. ती माहिती संशोधनामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी दिली होती. जर खरोखर लोकांनी अचूक माहिती दिली असेल तर संशोधन बरोबर असू शकते. या संशोधनात हे पण पाहिले जातेय की, वैज्ञानिकांनी काढलेल्या निष्कर्षात वाईनही स्मृतिभ्रंश या आजारापासून वाचवू शकते. अतिप्रमाणात दारु प्यायल्याने उच्च रक्तदाब, स्ट्रोक, यकृताचे आजार आणि काहीप्रकारचा कर्करोगासह स्मृतिभ्रंशाचा त्रास वाढू शकतो.  ब्रिटनच्या रिसर्च हेड डॉ.सारा इणारिसियोने सांगितले की, मिळालेल्या माहितीच्या निकालांवरून असे दिसून आले की, ज्या लोकांनी कधीही दारू प्यायली नाही त्यांना मद्यपान केलेल्या लोकांपेक्षा स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता जास्त होती.