सूर्यापेक्षा हजार पटीने मोठा तारा मोठ्या विस्फोटानंतर होणार लुप्त!

1128

आरोयन आकाशगंगेतील सर्वात चमकदार ताऱ्यांपैकी एक असणारा बीटलग्यूज आता अंताच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे खेगोलतज्ज्ञांनी सांगितले. पृथ्वीवरूनही हा तारा सहज दिसतो. आता या ताऱ्याची चमक झपाट्याने कमी होत आहे. बीटलग्यूज हा लाल रंगाचा तारा असून तो आरोयन आकाशगंगेचा भाग आहे. हा तारा आपल्या सूर्यापेक्षा हजार पटींनी मोठा आहे. एखाद्या ताऱ्याची चमक कमी होते, तेव्हा तो त्यांच्या अंताकडे वाटचाल करतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. अशा स्थितीला ‘सुपरनोवा फेज’ म्हणातात.

या ‘सुपरनोवा फेज’च्या टप्प्यात तारा पोहचल्यावर त्याची चमक कमी होते. त्यानंतर ताऱ्य़ामध्ये विस्फोट होतात. सुपरनोवाच्या शेवटच्या टप्प्यात शक्तीशाली विस्फोट होतो, त्यामुळे तारा नेहमीसाठी नष्ट होतो. अशाप्रकारे मोठ्या विस्फोटानंतर तारा लुप्त होतो. गेल्या काही महिन्यांमध्ये बीटलग्यूजची चमक खूपच कमी झाली आहे. त्यामुळे या ताऱ्याला सर्वात चमकदार ताऱ्यांच्या यादीतून 12 व्या स्थानावरून 20 व्या स्थानावर जागा देण्यात आली. हा तारा पृथ्वीपासून 642.5 प्रकाशवर्ष दूर आहे. या ताऱ्यात विस्फोट झाला तर पृथ्वीरून दिसणारा हा पहिला सर्वात जवळचा सुपरनोवा ठरू शकतो.

विलेनोवा विश्वविद्यालयाच्या एका खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की, बीटलग्यूजची चमक 430 दिवसात पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर लवकरच हा ताऱ्याची चमक नष्ट होणार आहे. त्यानंतर या ताऱ्याचा विस्फोट होऊन तो लुप्त होणार आहे. सध्याची या ताऱ्याची कमी होत असलेली चमक बघता हा तारा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. बीटलग्यूज हा आपल्या सूर्यापेक्षा हजार पटींनी मोठा आहे. खगोलतज्ज्ञ याला सुपरजाएंट्स म्हणतात. आपल्या आकाशगंगेबाहेर असे अनेक तारे आहेत. ते सूर्यापेक्षा खूप मोठे असून अशाचप्रकारे विस्फोटानंतर लुप्त होतात. मात्र,बीटलग्यूज हा आपल्या आकाशगंगेच्या सर्वात जवळ असल्याने त्यात होणारे विस्फोट आणि त्याचा लुप्त होण्याचा प्रवास याचा खगोलतज्ज्ञांना अभ्यास करता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या