भिकारी महिलेने ‘एवढे’ पैसे काढले की बँक झाली रिकामी, वाचा सविस्तर…

प्रातिनिधीक फोटो

लोकलच्या प्रवासादरम्यान, मंदिराबाहेर, शाळा, रेल्वे स्थानाकावजळ दिसणाऱ्या, रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांना आपण पुण्य म्हणून काही पैसे देत असतो. कधी-कधी भिकाऱ्याचे कपडे, त्याचा काळा-कळकट चेहरा पासून त्याच्याकडे नक्की किती पैसे असतील याचाही आपल्याला अंदाज येत नाही. असा अंदाजही बांधू नका, कारण तुमच्या-आमच्या अंदाजापेक्षाही अनेक पटीने त्यांच्याकडे पैसा असू शकतो.

आता हेच पाहा ना एका भिकारी महिलेने खात्यातून एवढे पैसे काढले की बँकेकडे इतर खातेधारांना देण्यासाठी रोकडच उरली नाही. या महिलेने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 6 कोटी 37 लाख रुपये आपल्या खात्यातून काढले. यानंतर सध्या सोशल मीडियावर तिच्याच नावाची चर्चा आहे. यामागील हकीकतही रोमांचक आहे.

beggar1

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, लेबनान येथील ही महिला असून वाफा मोहम्मद असे तिचे नाव आहे. ती एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये आपले पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गेली तेव्हा बँकेपुढे मोठा पेच निर्माण झाला. दोन चेकच्या माध्यमातून ती आपले पैसे दुसऱ्या खात्यात वळवून घेत होती. यानंतर तिच्या चेकचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

beggar

व्हायरल होणाऱ्या चेकवर 30 सप्टेंबर, 2019 तारीख दिसत आहे. यामागील कारणांचे शोध घेतला असताना वाफा मोहम्मद ही भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले. भीक मागूनच तिने एवढे गडगंज संपत्ती जमवली होती. ज्या रुग्णालयासमोर बसून ती भीक मागायची त्या रुग्णालयातील नर्सने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, मी तिला ओळखते. गेल्या 10 वर्षापासून ती रुग्णालयाच्या गेटसमोर भीक मागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या