हिंदू असल्याने मशिदीतील कार्यक्रमांना जाणार नाही – योगी आदित्यनाथ

4116

मी धर्म, जात, पंत असा भेदभाव करत नाही. मात्र मी हिंदू असल्याने मी मशिदीतील कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावू शकत नाही, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. राम जन्मभूमीच्या भूमीपूजनानंतर योगी आदित्यनाथ यांना मशीद उभारणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असा सवाल प्रसारमाध्यमांनी केला होता. त्यावर उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांनी मशिदीच्या कार्यक्रमावरून योगी आदित्यनाथ यांना हटकले. त्यावेळी त्यांनी आपण मशिदीतल्या कार्यक्रमांना जाऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. ‘तुम्हाला वाटतं का ते मला मशिदीच्या भूमीपूजनाला बोलवतील? मला तसे वाटत नाही. पण मी एक हिंदू आहे. भलेही मी धर्म, जात पंत यात भेदभाव करत नसलो तरी मी एक योगी असल्याने मी मशिदीतील कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाही’, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या