‘या’ हॉटेलमध्ये पिण्यासाठी दिले जाते ‘टॉयलेटचे पाणी’

1357

तुम्हाला जर अशा एखाद्या हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले, जिथे पिण्यासाठी टॉयलेटचे पाणी दिले जाते. तर नक्कीच आपण तेथे जाण्यास नकार द्याल. किंबहुना तुम्हाला या गोष्टीचा राग ही येऊ शकतो. मात्र तुम्ही जाणून हैराण व्हाल की,जगात एक असेही हॉटेल आहे जिथे ग्राहकांना पिण्यासाठी ‘टॉयलेटचे पाणी’ दिले जाते.

या हॉटेलचे नाव ‘गस्ट यूक्स’ असे असून हे बेल्जियम येथे आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांना पिण्यासाठी टॉयलेटचे पाणी रिसायकल करून दिले जाते. यासाठी हायटेकमध्ये नवीन तंत्रज्ञान असलेले वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले आहे. हॉटेलमध्ये बसवण्यात आलेला हा वॉटर प्युरिफायर गटारातील पाणी देखील पिण्या योग्य बनवू शकतो.

गस्ट यूक्समध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सिंक किंवा टॉयलेटचे पाणी आधी फर्टिलायझरमध्ये स्वछ केले जाते. यानंतर या पाण्यात पावसाचे पाणी मिळवले जाते. नंतर या पाण्याला वॉटर प्युरिफायरमध्ये टाकून पिण्या योग्य बनवले जाते. हॉटेलमध्ये आईस क्यूब, बिअर आणि कॉफी बनवण्यसाठी देखील याच पाण्याचा उपयोग केला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या