प्रत्येकाने गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपावे, बेल्जियम गिर्यारोकहाचे आवाहन

720

महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांचं अनमोल देणं लाभलं आहे. शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे सह्याद्रीच्या कुशीतील 200 गड 2 महिन्यांत सर करण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक किल्ल्याचा एक वेगळा जाज्वल्य इतिहास आहे. प्रत्येकाने या किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊन त्याचे पावित्र्य जपावे असे आवाहन बेल्जियम गिर्यारोहक पीटर व्हॅन यांनी केले आहे. तसेच नगरकरांमध्ये पर्यटनाची आवड निर्माण करणारा ट्रेकॅम्प संस्थेचा उपक्रम देशात मार्गदर्शक ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले.

नगरमधील ट्रेकॅम्प डिस्कव्हर अननोन संस्थेच्या वतीने आम्रपाली गार्डन येथे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात पीटर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ऊर्जा गुरुकुल स्कूलच्या संस्थापिका कल्याणी फिरोदिया, ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी आदी उपस्थित होते.

या वेळी पीटर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून ट्रान्स सह्याद्री मोहिमेची सचित्र माहिती दिली. ते म्हणाले की, नगरमधील  लोकांना भेटल्यानंतर मला माझ्या घरी आल्यासारखे वाटले. महाराष्ट्राची संस्कृती आणि पाहुणचाराने मी अक्षरशः भारावून गेलो आहे. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राला भौगोलिक आणि ऐतिहासिक परंपरेचे सौंदर्य लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांना भेटी देऊन स्फूर्ती आणि सकारात्मकतेची जाणीव होते. व्यायाम व योग्य आहार घेऊन आरोग्य जपा असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या