बेल फॉर वॉटर, ‘या’ शाळेत होते पाणी पिण्याची सुट्टी!

1456

शाळा भरली की विद्यार्थ्यांचे लक्ष मधल्या सुट्टीकडे असते. ही सुट्टी मध्यान्ह भोजनासाठी असते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील भातगाव कोसबी शाळेत पाणी पिण्याची सुट्टी सुरू करण्यात आली आहे. दिवसभर मुले पुरेसे पाणी पीत नसल्याने जि.प. शाळा भातगाव कोसबी येथे ‘रिंग द बेल फॉर वॉटर’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांना पाणी पिण्यास प्रेरित केले जात आहे.

पाणी म्हणजे जीवन! आपले आरोग्य निकोप राहण्यासाठी नियमित व पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसात दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पण मुले एवढे पित नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी पिण्याचा महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले आहे. पाणी पिण्याच्या दिवसातून पाच सुट्या होतात. त्यासाठी बेल दिली जाते. बेल दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दोन मिनिटे पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी जेवढी तहान असेल तेवढे पाणी पितात.

पहिला घंटानाद सकाळी 11 वाजता दिली जाते त्यानंतर दुसरा घंटानाद दुपारी 12 वाजता, 1 वाजता, 3 वाजता आणि 4 वाजता असे दिवसातून चार वेळा घंटानाद केला जातो. आरोग्य विज्ञानानुसार पाणी नियमितपणे प्याल्याने मूत्रावाटे क्षार बाहेर टाकले जातात त्यामुळे आजार होण्याची शक्यता कमी असते. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्वांचे परिवहन,शरीरातील विषारी पदार्थांची विसर्जन या सर्व क्रिया पाण्यावर अवलंबून आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये जलजागृती व्हावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे मुख्याध्यापक संतोष रावणंग यांनी सांगितले. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या