इंदिरा गांधींच्या रुपातली अभिनेत्री कोण? युझर्स म्हणतात मेकअप आर्टिस्टला राष्ट्रीय पुरस्कार द्या!

actress-look-like-indira

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका याआधीही काही अभिनेत्रींनी साकारली आहे. मात्र आता इंदिरा गांधींच्या रुपात नवीन अभिनेत्री झळकणार आहे. ओळखा पाहू ही अभिनेत्री कोण आहे?


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

नुकताच ‘बेलबॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्य बडे कलाकार पाहायला मिळात आहेत. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये एका विमानाला हायजॅक केले जाते. अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. परफॉर्मन्स, संगीत, व्हिजुअल्स सगळ्याच बाबतीत ट्रेलरचं कौतुक होत आहे. यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या रुपात एक अभिनेत्री देखील दिसत आहे. तिच्या या लूकबद्दल तिचं आणि मेकअप आर्टिस्टचं कौतुक होत आहे. एका युझरने तर या आर्टिस्टला राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे, असे म्हटलं आहे.

अजूनही तुम्ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लूक मधील अभिनेत्री कोण हे ओळखलं नाही? तर त्याचं उत्तर आहे लारा दत्ता. तिच्या लूकसोबतच अभिनयाची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तिच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. तसेच डायलॉग देखील दमदार असल्याचं युझर्सचं म्हणणं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या