इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला अटक

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू बेन स्टोक्सला ब्रिस्टल पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळताना दिसणार नाही. प्राथमिक माहितीवरुन एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मारहाणीची घटना घडली तेव्हा अॅलेक्स हेल्स आणि स्टोक्स सोबत होते. स्टोक्ससह अॅलेक्स हेल्सलाही पोलिसांनी चौकशीसाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अॅलेक्स हेल्सही वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळताना दिसणार नाही.

बेन स्टोक्सला एका प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. चौकशीनंतर कोणताही गुन्हा न दाखल करता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र चौथ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळू शकणार नाही, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.

रविवारी ब्रिस्टलमध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात बेन स्टोक्सने ६३ चेंडूंमध्ये ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. हा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.