विराटच्या शिवीमुळे मी बदनाम झालोय, स्टोक्सची ट्विटर बंद करण्याची धमकी

सामना ऑनलाईन । लंडन

विराट कोहलीच्या शिवीमुळे मी बदनाम झालो आहे, त्यामुळे मला ट्विटर अकाउंट डिलीट करावं लागेल, असा आरोप इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने केला आहे. त्याला कारणही असेच आहे. विराट कोहली सामन्यादरम्यान सेलिब्रेशन करताना अपशब्दाचा वापर करतो. चाहत्यांनी चक्क तो अपशब्द वापरत नाही तर बेन स्टोक्सचे नाव घेत असल्याचा गमतीशीर व्हिडीओ व्हायरल केला आहे.

पाकिस्तानवरील विजयानंतर विराट रंगला बालपणात, भन्नाट फोटो केला शेअर

ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यादरम्यान चाहत्याने अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यानंतर पाकिस्तानबरोबरचा सामना जिंकल्यानंतर त्यात आणखीच भर पडली. अनेक मिम्स येऊ लागले. नेटिझन्सनी बेन स्टोक्सलाच ट्रोल केले. त्यावर आता स्वत: बेन स्टोक्सने प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवननंतर भुवनेश्वर बाहेर

स्टोक्सनं ट्विट करत विराट कोहलीच्या चाहत्याची फिरकी घेतली आहे. बेन स्टोक्सने ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘विराटमुळं ट्विटर अकाउंट डिलीट करावे वाटत आहे. म्हणजे मग कोणीही असे म्हणणार नाही की विराट कोहली सेलिब्रेशन करताना माझ्या नावाचा उच्चार करतोय. प्रत्यक्षात विराट कोहली काय म्हणतो हे तुम्हाला माहित आहे. पण हे सर्व खूप मजेशिर आहे.‘