IPL 2021 – राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, स्टार ऑल राऊंडर खेळाडू स्पर्धेतून बाहेर

आयपीएलची स्पर्धा रंगात आली आहे. एकापेक्षा एक जबरदस्त सामने दररोज रंगत आहेत. मात्र या दरम्यान राजस्थान रॉयल्सला एक जबरदस्त धक्का बसला आहे. ऑल राऊंडर बेनस्टेक्सच्या बोटाला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ben-stokes

सोमवारी राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्जमध्य़े झालेल्या सामन्याच्या वेळी ख्रिस गेलचा झेल घ्यायचा प्रयत्न करत असताना स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली. गुरुवारी त्याच्या बोटाचा एक्सरे काढण्यात येणार आहे. मात्र त्याच्या बोटाची दुखापत गंभीर असल्याने तो पुढील सामने खेळू शकणार नाही. त्याची गैरहजेरी संघासाठी मोठा फटका असल्याचे राजस्थान रॉयल्सने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

याआधी राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतलेली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या बोटावर मार्च महिन्यात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे सध्या तरी जोफ्रा आर्चर आयपीएलमध्ये सहभागी होणार नाहीए.

आपली प्रतिक्रिया द्या