वर्ल्डकपचा ‘हिरो’ बेन स्टोक्सने पत्नीचा गळा दाबला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

1988

इंग्लंडला एकहाती विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुन्हा वादात सापडला आहे. बेन स्टोक्सच्या पत्नीला त्याच्यावर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. स्टोक्स पत्नी क्लेअरचा गळा दाबतानाचा एक फोटोही व्हायरल झाल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली. हे प्रकरण गंभीर होण्यापूर्वीच क्लेअरने याचा खुलासा केला आहे.

stokes

‘प्रोफेशनल क्रिकेटर्स एसोसिएशन अवॉर्ड’ सोहळ्यादरम्यान स्टोक्स आणि पत्नी क्लेअरचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये स्टोक्स पत्नीचा गळा दाबताना दिसत आहे. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हायरल फोटोनंतर स्टोक्सवर टीका होऊ लागल्याने पत्नीने याबाबत ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. बेन स्टोक्सने माझा गळा दाबल्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत, असे क्लेअरने स्पष्ट केले आहे.

क्लेअरने ट्विटवर म्हटले की, ‘माझा यावर विश्वास बसत नाहीये. लोकं एका फोटोवरून एवढे कसे काय बनवू शकतात. मी आणि बेन मस्तीमध्ये एकमेकांचा चेहरा दाबत होतो. असे करून आम्ही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत होतो. परंतु लोकांनी याला वेगळीच कथा जोडून दिली. यानंतर आम्ही मॅकडोनाल्डसलाही गेलो होतो.’

स्टोक्सने देखील क्लेअरचे ट्वीट रिट्वीट केले आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे चीफ एक्झिक्यूटिव्ह टॉम हॅरिसन यांनी आम्ही सोहळ्याला आलेल्या लोकांशी याबाबत चर्चा केल्याचे सांगितले. लोकांनी देखील हे फक्त प्रेम असल्याचे सांगितल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या