बदाम कुणी खाऊ नये? वाचा काय आहेत फायदे तोटे

सुका मेवा मधील ‘बदाम’ हा अत्यंत पौष्टिक मानला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की बदाम सर्वांसाठी फायदेशीर ठरेलच असे नाही. काही लोकांनी बदामाचे सेवन केल्यास त्रास बळावू शकतो. म्हणून बदामाचे फायदे आणि तोटे याची माहिती असणे आवश्यक आहे.

बदामाचे फायदे

> मुठभर बदामात 170 ग्रॅम फायबर असते. आपल्याला रोज 25 ते 40 ग्रॅम फायबर आवश्यक असते. त्यामुळे दिवसाला 3 ते 4 बदाम पुरेसे आहेत.

> बदाम वजन कमी करण्यास मदत करतात. बदामात फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. ज्यामुळे ओव्हर इटिंग रोखण्यासाठी बदाम मदतगार होऊ शकतो.

> बदाममध्ये मॅग्नेशियम हा महत्त्वाचा घटक असतो. ज्याचे शरीराला बरेच फायदे आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यास यामुळे मदत होते.

> बदामात व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते. हे दोन घटक हाडं मजबूत करतात. तसेच शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेला मदत करतात.

सावधान! कुणी बदामाचे सेवन करताना काळजी घ्यावी

> बदाम हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र असे असलेतरी ते प्रमाणात खाणे आवश्यक आहे. प्रमाणाबाहेर बदाम खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे त्याचे योग्य प्रमाणातच सेवन करावे.

> पचनाच्या समस्या असतील तर बदामाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बदामाच्या अधिक सेवनाने जुलाब किंवा बद्धकोष्ठता यासारखे परिणाम सहन करावे लागण्याची शक्यता असते.

> अधिक प्रमाणात बदाम खाल्यास ते पचण्यास जड जाते आणि त्यातूनच ब्लोटिंग सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी बदाम खाताना काळजी घेणे आवश्यक आहे.

> तुम्हाला एखाद्या आजारावर औषध सुरू असेल अशा वेळी बदाम खाणे टाळावे किंवा त्याचे प्रमाण डॉक्टरांना विचारून निश्चित करावे. बदामात मॅग्नेशियम असते, ज्याच्यामुळे औषधावर परिणाम होतो. त्यामुळेच अशावेळी बदाम खाण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.

> ज्यादा व्हिटॅमिन देखील शरीराला चांगले नाही. 3-4 बदमातून तुम्हाला 7.4 mg व्हिटॅमिन ई मिळते. यापेक्षा ज्यादा बदाम सेवन केल्यास त्रास होऊ शकतो.

कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीने दिवसाला 3 – 4 बदाम सेवन करणे पुरेसे ठरते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहारात बदल करावा.

आपली प्रतिक्रिया द्या