कापुरासोबत एक चमचा लवंग जाळण्याचे ‘हे’ आश्चर्यचकित करणारे फायदे जाणून घ्या…

लवंगेचा आकार लहान, पण फायदे मात्र जबरदस्त आहेत. विड्याच्या पानासोबत आपल्याकडे लवंग खाण्याची प्रथा आहे. आयुर्वेदामध्ये विशेष लवंगेला विशेष महत्व आहे. सर्दी-पडसे झाले की आजीबाईच्या बटव्यातून लवंग बाहेर येते आणि मधासोबत खायला दिली जाते. यासह हवा शुद्ध करण्यासाठीही लवंगेचा वापर केला जातो. घरामध्ये एक चमचा लवंग किंवा कापुरासोबत लवंक जाळल्याने आश्चर्यचकित करणारे फायदे मिळतात.

हवा शुद्ध होते

घरामध्ये लवंग जाळल्याने हवा शुद्ध होते आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. तसेच लवंग जाळलेली हवा नाकावाटे फुफ्फुसामध्ये गेल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते, असे एका अभ्यासात समोर आले आहे.

लवंग आणि कापूर

आरतीवेळी आपल्याकडे कापूर जाळला जातो. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. लवंग आणि कापूर एकत्र जाळल्यास घरातील हवा शुद्ध होऊन सकारात्मक उर्जा निर्माण होईल.

सायन्स काय म्हणते?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलाजी इन्फॉर्मेशनने (National Center for Biotechnology Information) केलेल्या एका अभ्यासानुसार, लवंग शरीरासाठी उर्जेचा स्त्रोस असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि लिव्हर देखील व्यवस्थित कार्य करते.

‘या’ पद्धतीने करा वापर

लवंगेचा वापर अनेक पद्धतीने केला जाऊ शकतो. लवंगेचे तेलही बाजारामध्ये उपलब्ध आहे. तसेच लवंगेचा वापर मसाल्यातही होतो. अनेक लोक लवंगेचा चहाही पितात. तसेच पुलाव, भात यामध्येही याचा वापर केला जातो.

लवंगेचे आरोग्यदायी फायदे

clove

– लवंगेचा आहारामध्ये समावेश केल्यास सायनस आणि नाकाच्या इतर तक्रारींपासून आराम मिळतो.
– चेहऱ्यावरील डाग आणि पुरळ दूर करण्यासाठी लवंगाच्या तेलाचा उपयोग होतो.
– पचनक्रिया सुधारते. गॅस, जळजळ, अपचन आणि उलट्या होणे यांसारख्या तक्रारींवर गुणकारी आहे.
– एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लंवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा.
– लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंधी दूर होते.
– लवंगाचे तेले सांध्यांवर लावल्याने सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.

आपली प्रतिक्रिया द्या