Tips – हिवाळ्यात हरभरा खाण्याचे फायदे, फक्त ‘या’ लोकांनी घ्यावा हात आखडता

हिवाळा आला की प्रत्येक जण तब्येतीची अधिक काळजी घेताना दिसतो. कुडकुडणाऱ्या थंडीत भूक जास्त लागते, मात्र योग्य आहार घेतल्यास त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. हिवाळ्यात काही विशिष्ट पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समावेश केला तर आपल्या आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरणार आहे. यात हरभरा याचा देखील समावेश असून भिजलेला हरभरा, हरभराची भाजी किंवा कालवण, वाटली डाळ आपण खाऊ शकतो.

हरभरा खाण्याचे फायदे –

– हरभऱ्यात असणाऱ्या मॉलिक अॅसिड, ऑक्झालिक अॅसिड यामुळे उलटी, अपचन या समस्या दूर होतात.

– व्यायाम करणाऱ्यांनी हरभरा खावा, यामुळे स्नायू बळकट होतात आणि साईज वाढते.

– ओल्या हरभराच्या पानांमध्ये लोहाचे पुरेपूर प्रमाण असते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी हरभऱ्याच्या पानांची भाजी खावी.

‘या’ लोकांनी टाळणेच योग्य

हरभरा हा जड पदार्थ असल्याने पचण्यास जड आहे. तसेच तो उष्ण, तुरड-गोड चवीची आहे. त्यामुळे वातदोष वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच, वातप्रकृतीच्या व्यक्तींनी हरभरा डाळ किंवा हरभऱ्याचे सेवन करु नये.

पचण्यास जड असल्यामुळे पचनशक्ती मंद असणाऱ्यांनी किंवा अपचनाचा त्रास होणाऱ्यांनी हरभऱ्याचे सेवन टाळावे.

आपली प्रतिक्रिया द्या