Health tips – रोज फक्त 1 लवंग खा, ‘या’ 8 समस्यांपासून आराम मिळवा

धकाधकीच्या आयुष्यात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तेलकट, तुपकट, मैद्याचे पदार्थ खाण्याचे प्रमाणही वाढले सून यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लोक योगा आणि आयुर्वेदाचा आधार घेत आहे. आयुर्वेदात लवंगेला अनन्यसाधारण महत्व आहे. मसाल्यात वापरला जाणारा हा घटक अनेक समस्यांवर उपायकारक आहे. जाणून घेऊ…

1. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंग खाणे फायदेशीर आहे. तसेच रोज दोन-तीन लवंग चघळल्यास खोकला आणि तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.

2. पोटात जळजळची (ऍसिडिटी) समस्या असेल तर लवंगचा खिस करून पाण्यात मिसळावे आणि सेवन करावे.

3. आयुर्वेदानुसार मधुमेहावर लवंग लाभदायी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.

Health tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10 फायदे

4. खूप तहान लागते किंवा जास्त घाम येतो अशा व्यक्तींनी गरम पाण्यात लवंग वाटून पाण्यात मिसळून प्यावी. यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होईल.

5. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर आहे. यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल.

6. लवंगात अँटी ऑक्‍सीडेंट तत्व आढळतात. यामुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Health – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे माहिती का? जाणून घ्या

7. लवंगात असणाऱ्या गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर लवंग गुणकारी आहे.

8. दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी पळून जाईल.

Health Tips – आवळा रस अनेक आजारांवर आहे गुणकारी, जाणून घ्या 7 फायदे

आपली प्रतिक्रिया द्या