‘CNG’ कार चालविण्याचे ‘हे’ आहेत मोठे फायदे! वाचा…

5173

आजच्या काळात हवेत प्रदुषणाचे प्रमाण हे दिवसागणिक वाढत चालेल आहे. हे लक्षात घेऊन देशातील प्रत्येक नागरिकांनी प्रदूषण कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत यावर काही ठोस उपाय करण्याची आवश्यकता आहे. जर आपण पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारी कार चालवत असाल तर त्यामुळे बर्‍याच प्रमाणात प्रदूषणात वाढ होत आहे.  मात्र याच जागी जर आपण सीएनजीवर चालणारी कार चालवली तर त्यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सीएनजी कार चालविण्याच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत.

खर्च वाचावा

जर आपण सीएनजीवरील कार चालवली तर आपल्या अधिक पैशांची बचत करता येईल. नैसर्गिक वायू पेट्रोल डिझेलच्या तुलनेत स्वस्त आहे. म्हणून सीएनजीवरील वाहनांचा वापर आपण जितका करू तितका आपल्याला फायदा होईल. दररोज कार चालवणाऱ्यांना सीएनजीचा अधिक फायदा होऊ शकतो.

प्रदूषण कमी होते

जर आपण पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधन शक्तीने चालणारे वाहन चालवत असाल, तर यामुळे प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढते. या वाहनांऐवजी सीएनजीवर चालणारे वाहन चालवले तर प्रदूषण कमी होईल. सीएनजी मुळे कार्बनडाय ऑक्साईड वायू आणि पाण्याची वाफ तयार होते. ज्यामुळे हानिकारक कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होते.

हिंदुस्थानात ‘सीएनजी’ मुबलक 

हिंदुस्थानात सीएनजी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सध्याच्या मागणीनुसार हिंदुस्थानात पुढील 27 वर्ष पुरेल इतका नैसर्गिक वायूचा साठा आहे. याऊलट पुढील पाच वर्षे पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा हिंदुस्थानमध्ये उपलब्ध आहे. हिंदुस्थानात देश आणि जगातील नामांकित कार उत्पादक कंपनी आपल्या सीएनजी कारचे उत्पादन करत असते. हिंदुस्थानी बाजारात मारुती सुझुकी अल्टो K10,  ह्युंदाई सेंट्रो, मारुती सुझुकी सेलेरिओ आणि मारुती सुझुकी ईको अशा अनेक कार सीएनजी पर्यायासह उपलब्ध आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या