रोगप्रतिकारक्षमता वाढण्याकरिता सोयाबीन खाण्याचे फायदे !

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकडे सध्या सगळेच कटाक्षाने लक्ष देत आहेत. याकरिता आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. प्रथिन आणि फायबरचे भरपूर प्रमाण ‘सोयाबीन’मध्ये आहे. पाहूया सोयाबीन म्हणजेच सोयाफूडचे आहारातील महत्त्व.

फूड सेफ्टि अँण्ड स्टँण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने(FSSAI) ट्विटरद्वारे असे प्रसिद्ध केले आहे की, सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीरातील फायबर आणि प्रथिनांची गरज यामुळे भरून निघते. तसेच ह्रदयाच्या आरोग्याकरिता सोयाबीन खाणे आवश्यक आहे.

शाकाहारी लोकांकरिता सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे. मांसाहाराप्रमाणेच पौष्टिक घटक सोयाबिनमध्ये असतात. त्यामुळे शाकाहारींनी आहारात सोयाबीनचा समावेश करावा.

सोयाबीनमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. तसेच मिनरल्स, जीवनसत्त्व बी आणि ए भरपूर प्रमाणात असते.

सोया नगलेट, टोफू, सोया ग्रॅन्युएल, सोया मिल्क, सोया पीठ आणि सोया नट्स अशा विविध पद्धतीने आहारात सोयाबीनचा समावेश करता येतो. शरीरातील फायबर आणि प्रथिनांची कमतरता दूर करण्याकरिता सोयाबीन खाणे हा चांगला पर्याय आहे.

सकाळच्या न्याहारीच्या पदार्थांमध्येही सोयाबीनचा समावेश करता येईल. तसेच सोयाबीन खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण राहते.

वजन कमी करणे, निद्रानाश, पचनक्रियेशी संबंधित आजारावर सोयबीन खाणे फायदेशीर ठरते, मात्र याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या