मेथीत आहेत औषधी गुण; ‘या’ आजारांपासून मिळते मुक्ती

पावसाळ्यात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे मेथी. पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या सेवनाने अनेक आजारांपासून मुक्तीही मिळते. या सर्व पालेभाज्यांमध्ये सर्वाधिक फायदे आहेत, ते मेथीचे. मेथीचा उपयोग भाजीमध्ये तसेच सलाद म्हणूनही करतात. तसेच मेथीचे दाणे विविध भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठी आणि काही मसाल्यांमध्येही वापरतात. त्याचप्रमाणे औषधी गुण असल्याने विविध औषधांमध्येही मेथीचा वापर होतो.

पचनाची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी मेथी रामबाण इलाज आहे. पचन क्रिया सुधारण्यासाठी मेथीचा उपयोग होतो. एच चमचा मेथीचे दाणे दोन ग्लास पाण्यात टाकून उकळण्यास ठेवावी. मेथीचा रंगा पाण्याला येईपर्यंत मेथीचे पाणी चांगले उकळू द्यावे. त्यानंतर त्यातील दाणे काढून ते कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होण्यासोबतच बद्धकोष्टतेच्या समस्याही दूर होतात. मेथीच्या कोमट पाण्याच्या सेवनाने निद्रानाशाची समस्याही दूर होते. तसेच झोपण्याआधी या पाण्याचे सेवन केले तर शांत झोप येते.

वाढत्या वजन आणि शरीरातील वाढत्या मेदावर नियंत्रण मिळवण्यासाठीही मेथी फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शरीरातील कोलेस्ट्रोरॉलही नियंत्रणात राहते. त्याचबरोबर किडणीशी संबंधित त्रास असल्यासही मेथीच्या सेवनाने फायदा होतो. मेथीची भाजी आणि दाणे यांच्या नियमित सेवनाने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. मेथीच्या सेवनाने हृदयरोग आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार रोखण्यास मदत होते. मेथीची भाजी किंवा दाणे दोन्हीमध्येही औषधी गुण असल्याचे त्याच्या सेवन फायदेशीर ठरते. मेथीच्या कडवट चवींमुळे सवन करणे अडचणीचे वाचत असल्यास मेथीचेलाडून बनवूनही त्याचेसेवन करता येते.

आपली प्रतिक्रिया द्या