हळदीचे दूध

हळदीमध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे  तिचा वापर हिंदुस्थानात फार पूर्वीपासून केला जातो. दुधामध्ये हळद घालून घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती तरवाढतेच, पण हळदीचा वापर हिंदू संस्कृतीत लग्नातही म्हणूनच केला जातो.

दुधात हळद आणि मध टाकून प्यायल्यास भरपूर ताकद मिळते. त्यात पौष्टिक घटक असतात.

हळदीचे दूध प्यायल्याने हाडं मजबूत राहतात. सांधेदुखीसारख्या आजारांपासून बचाव होतो.

हे दूध प्यायल्याने शरीर रिलॅक्स होते आणि चांगली झोप लागते.

हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला, गळ्याकडे होणारी खवखव यापासून आराम मिळतो.

हळदीचे दूध रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.

> हळदीच्या दुधात ऍण्टी बॅक्टेरिअल गुणधर्म असल्याने त्वचेसंबंधीचे आजार दूर होतात. त्वचा कोमल आणि तजेलदार दिसते.

> हळदी घातलेले दूध शरीरात नको असलेले फॅट बर्न करुन वजन आटोक्यात आणण्यास मदत करते.

हे दूध जखम आणि घाव भरण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. तसेच आतील जखमही बरी करतात.

हे दूध प्यायल्याने कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यापासून वाचवते.

शरीरात नको असलेले पदार्थ काढून टाकून किडणी आणि रक्त शुद्ध करण्याचे काम करते.