शेंगदाण्यामुळे गमवावी लागली नोकरी!

36

सामना प्रतिनिधी । बंगळुरू

शेंगदाणे घेणे एका पोलिसाला चांगलच महागात पडलं आहे. बंगळुरूमध्ये एका पोलिसाने विक्रेत्याकडून शेंगदाणे घेतल्याप्रकरणी नोकरीतून निलंबित करण्यात आलं आहे. हा पोलीस कर्नाटक पोलीस दलात सहाय्यक हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. मंडाक्की असं या पोलिसाचं नाव आहे.

कामावर जात असताना हा हेड कान्स्टेबल शेंगदाणे विक्रेत्यांकडून वसुली करत होता. या वसुलीला विक्रेत वैतागले होते. हा पोलीस ही वसुली करत असताना, बाजापेठेतील एका ग्राहकाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ त्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ‘लाच मागण्याची नवी पद्धत’ नवी पद्धत असं कॅप्शन त्याला दिलं. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर डीसीपी बी. जी. थिमनवर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीअंती दोषी आढळलेल्या मंडाक्की याला निलंबित केलं.

आपली प्रतिक्रिया द्या