मोदींच्या ‘हग डिप्लोमसी’ची काँग्रेसकडून ट्विटरवर थट्टा

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सहा दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. नेतान्याहू नवी दिल्ली पोहोचले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व प्रोटोकॉल तोडत विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदींनी नेतान्याहू यांची गळाभेट घेतली. पंतप्रधानांच्या स्वागताच्या या खास अंदाजाची काँग्रेसने थट्टा केली आहे. काँग्रेसने एक व्हिडिओ ट्वीट केल्याने राजकीय वॉर सुरू झाले आहे.

काँग्रेसने ट्विटरवर एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ‘हग डिप्लोमसी’ची थट्टा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या गळाभेटीला काँग्रेसने हे ‘खुपच अति’ आहे असं म्हटलं आहे. यामध्ये मोदींचे अनेक जुने व्हिडिओ दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये मोदींनी अनेक मोठ्या नेत्यांची गळाभेट घेतली होती. यात मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीसोबतची भेट, जर्मनीचे चान्सलर अंगेला मर्केलसोबतची भेट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची बेट, तुर्कीच्या राष्ट्रपतीसोबतची भेट, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांच्यासोबतची भेटीचे क्षण दाखवले आहेत.

इस्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींसाठी आणलं ‘खास’ गिफ्ट

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रविवारी हिंदुस्थानात दाखल झाले. नेतान्याहू पत्नी सारासोबत हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आले आहेत. इस्रायलच्या पंतप्रधानांनी तब्बल १४ वर्षांनंतर हिंदुस्थानचा दौरा केला आहे. नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर  नेतान्याहू यांनी तीन मूर्ती चौकाला भेट दिली आणि हायफाच्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आता तीन मूर्ती चौकाचं नाव बदलून ‘तीन मूर्ती हायफा चौक’ ठेवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या