हिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये हिंदुस्थानने पॅलेस्टाइन संस्थेविरोधात इस्त्रायलच्या बाजूने मतदान केल्याबद्दल इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिंदुस्थानचे आभार मानले आहेत. बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्वीट करून यूएनमध्ये इस्त्रायलच्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल हिंदुस्थानचे आभार मानले

यूएनमध्ये प‌ॅलेस्टीनियन संस्थेने हमास बरोबरचे आपले संबंध उघड न केल्यामुळे त्यांना सल्लागाराचा दर्जा देण्यावर इस्त्रायलने आक्षेप घेतला होता. संयुक्त राष्ट्रात या प्रस्तावावर झालेल्या मतदानावेळी हिंदुस्थानने इस्त्रालयच्या बाजूने मतदान केले. ईसीओएसओसीच्या बैठकीत पॅलेस्टीनियन एनजीओ विरोधात एल.15 हा मसुदा प्रस्ताव सादर केला होता. 28 विरुद्ध 15 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पाच देशांनी मतदानात भाग घेण्याचे टाळले. हिंदुस्थान, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी,ॉ आयर्लंड, जापान, कोरिया, युक्रेन, युके आणि अमेरिका या देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. संयुक्त राष्ट्रात साथ दिल्याबद्दल इस्त्रायलने हिंदुस्थानचे आभार मानले आहेत.