आजोबा झाले ‘बाबा’, 89 वर्षांच्या वयात झाला मुलगा

8539

बातमीचं शीर्षक वाचून चक्रावला असाल ना? पण, हो. हे वृत्तं खरं आहे. एका 89 वर्षांच्या वयात एका माणसाला नुकताच मुलगा झाला आहे. त्यांची पत्नी त्यांच्याहून 45 वर्षांनी लहान आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, बर्नी एक्लेस्टोन असं या व्यक्तिचं नाव आहे. बर्नी हे फॉर्म्युला वन कार रेसिंगचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांची पत्नी फॅबियाना फ्लॉसी हिने बुधवारी एका मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव एस असं ठेवलं आहे. फॅबियाना आणि बर्नी यांचा विवाह 2012मध्ये झाला होता. हा त्यांचा तिसरा विवाह असून त्यांना यापूर्वीच्या विवाहातून तीन मुली आणि पाच नातवंडं आहेत.

bernne-fabiana

अब्जाधीश असलेल्या बर्नी यांचा पहिला विवाह इवी बॅमफोर्ड यांच्याशी झाला होता. त्यांना या विवाहापासून डेबोरा नावाची मुलगी आहे. डेबोरा या 65 वर्षांच्या आहेत. त्यांनी स्लाविका रॅडिक हिच्याशी दुसरा विवाह केला होता. या विवाहापासून त्यांना 35वर्षीय तमारा आणि 31 वर्षीय पेट्रा अशा दोन मुली आहेत. 2009मध्ये फॅबियाना हिच्याशी ओळख झाल्यानंतर बर्नी यांनी स्लाविका यांना घटस्फोट दिला होता.

बर्नी आणि फॅबियाना सध्या स्वित्झर्लंड येथे स्थायिक आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात बर्नी आपला 90वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यापूर्वीच पुन्हा एकदा बाबा झाल्याने खूप आनंदित झाल्याचं बर्नी यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या