10 हजारपेक्षाही कमी किंमतीत येतात ‘हे’ स्मार्टफोन, फिचर्सही दमदार

1939

स्मार्टफोन ही देखील आजच्या काळातील अत्यावश्यक गरज झाली आहे. 2019 मध्ये हिंदुस्थानात बजेट आणि लोकांची गरज पाहून अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च झाले. यातील अनेक स्मार्टफोनच्या किंमती खिशाला परवडणाऱ्या आहेत. पाहूया 10 हजार पेक्षाही कमी किंतीत येणारे तीन स्मार्टफोन..

रियलमी 3 (Realme 3) –

realme-3
रियलमी (Realme) या कंपनीच्या स्मार्टफोनची बाजारात मागणी वाढताना दिसत आहे. या सेग्मेटमधील Realme 3 हा स्मार्टफोन दमदार मानला जात आहे. या फोनमध्ये 3जीबी/4जीबी रॅम आणि 32जीबी/64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. याची किंमत 7999 पासून पुढे सुरू होते. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. फोनला फेस अनलॉक देण्यात आले आहे आणि बॅटरी 4230एमएएच देण्यात आली आहे. याचा डिस्प्ले 6.2 इंच आहे.

सॅमसंग गॅलक्सी एम10एस (Samsung Galaxy M10S) –

samsung-galaxy-m10s
स्मार्टफोनच्या बाजारातील भरवश्याची कंपनी सॅमसंगने नुकताच सॅमसंग गॅलक्सी एम10एस (Samsung Galaxy M10S) हा स्मार्टफोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केल्या. या फोनमध्ये 6.4 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. 3जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये हा फोन उपलब्ध आहे. मेमरी कार्डच्या सहय्याने ही स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. या फोनला 13 एमपीचा आणि 5 एमपीचा असे ड्युअल रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. फोनची बॅटरी 4000 एमएएचची आहे. या फोनची किंमत 7999 पासून पुढे सुरू होते.

व्हिओ वाय91 (Vivo Y91) –

vivo-y91
व्हिओ वाय91 (Vivo Y91) हा फोन तरुणांमध्ये प्रचंड पॉप्यूलर झाला आहे. याची किंमत 8490 रुपये आहे. या स्मार्टफोनला 6.22 इंचांचा फूल व्ह्यू एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. 3 जीबी रॅम आणि 32 स्टोरेज देण्यात आली असून स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी 13 आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा व 8 मेगाफिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4030एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या