मार्गदर्शक… सखा… सोबती…

91

किशोरी शहाणे

तुमचा मित्र..दीपक बलराज विज

त्यांच्यातली सकारात्मक गोष्ट..खूप उत्साही, धाडसी, प्रोत्साहन देणारा आहे.

त्यांच्यातली खटकणारी गोष्ट..त्यांना पटकन राग येतो.

त्यांच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..बॉबी विज माझा मुलगा

त्यांच्याकडून काय शिकलात ?..त्यांचा बऱयाच विषयांचा अभ्यास आहे. मी कुठे कमी पडत असेन, जेव्हा मला मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा मी त्यांची मदत घेते. ते माझे मार्गदर्शक आहेत.

त्यांचा आवडता पदार्थ..त्यांना सगळे गोड पदार्थ आवडतात.

ते निराश असतात तेव्हा..विश्रांती घेतात.

एकमेकांसाठी वेळ देता का ?..हो नक्कीच. आमचे वेगळे मित्रमैत्रिणी नाहीत. तेच माझे बेस्ट फ्रेंड आणि मी त्यांची बेस्ट मैत्रिण आहे.

तुम्ही चुकता तेव्हा ते काय करतात त्यांच्याकडे चुकीला माफी नाही. ते स्पष्टपणे माझी चूक सांगतात आणि मला समजून सांगतात.

एकत्र फिरायला जायचे ठिकाण..आम्हाला अमेरिका, बँकॉक आणि जिथे आमचं फार्म हाऊस आहे तिथे आम्हाला जायला आवडतं.

त्यांच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण..आमच्या लग्नाचा क्षण

भांडण झाल्यावर काय करता ?..ते जर चिडलेले असतील तर मी काही बोलत नाही आणि मी चिडले असेन तर ते काही बोलत नाहीत.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ?..त्यांनाच माझ्यापेक्षा जास्त राग येतो.

तुमची एखादी त्यांना न आवडणारी सवय..मी खूप प्रॅक्टिकल आहे. प्रत्येक गोष्ट, क्षण प्रोडक्टिव्ह असला पाहिजे. मला फार टाइमपास नाही आवडत. त्यांना आयुष्य थोडं इझी घ्यायला आवडतं. ते दिग्दर्शक असल्यामुळे त्यांना क्रिएटिव्हिटि आवडते. त्याकरिता त्यांना स्वतःसाठी स्क्रिप्टवर वगैरे विचार करायला वेळ हवा असतो.

तुमच्या दृष्टिने मैत्रीची व्याख्या ?- आपल्या मित्राला न बदलता तो आहे तसा त्याला स्वीकारणं. त्यांच्यावर खूप निरपेक्षपणे प्रेम करणे.

तुम्हाला ते कसे हसवतात ? – माझा मूड चांगला नसेल अशावेळी आम्ही घरी एकत्र सिनेमा बघतो.

एकत्र पाहिलेला नाटक/ सिनेमा ? – नाटक- सही रे सही, सिनेमा टायटॅनिक

त्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली ? – ते माझे सर्व बाबतीत गुरु आहेत. मी लग्नाआधी कधीच व्यायाम वगैरे करत नव्हते. आता जी मी फिट दिसते ते त्यांच्यामुळेच. त्यांनी मला फिटनेसची सवय लावली.

 

आपली प्रतिक्रिया द्या