आजी आजोबा होणार मालामाल

239
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

ज्येष्ठ नागरिकांना बँकेत व पोस्टात जमा रकमेवरील व्याजावर या अर्थसंकल्पात भरघोस करसवलत देण्यात आली आहे. ही सवलत १०,००० हजाराहून ५०,००० वर करण्यात आली आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे कलम १९४ अ अनुसार जमा रकमेवर टीडीएस कापला जाणार नाही. तसचे एफ डी व आर डी वर मिळणाऱ्या व्याजातही वाढ होण्याची शक्यता आहे.

तर कलम ८० ड नुसार आरोग्य विमा किंवा उपचारावरील खर्चावरील कराची मर्यादा ३०,००० रुपयांवरून ५०,००० वर करण्यात आली आहे. तर कलम ८० डडब अंतर्गत गंभीर आजारांवरील उपचारांमधील कपात खर्चाची मर्यादा ६०,०००( ६० ते ८० वर्ष वयोमान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी) आणि,८०,००० रुपयांहून वाढवून १ लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.पंतप्रधानमंत्री वय वंदना योजनेचा कालावधी २०२० मार्च पर्यत वाढवण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूकची रक्कम ७.५ लाख रुपयांवरुन १५ लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या