बेस्ट थर्टीफर्स्टसाठी सोडणार जादा बसगाड्या

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला रात्री मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. रात्री १० वाजल्यापासून २० बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

बेस्ट प्रशासनाने ००७ (मर्या.),१११ ,११२ २०३, २३१, २४७ आणि २९४ या मार्गांवर रात्री १० वाजल्यापासून २० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच, चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी ठिकाणी वाहतूक अधिकारी, बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाने दिली आहे.

००७ – (बॅक बे डेपो ते विक्रोळी पार्क साइट)
१११ – (सीएसटी ते श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रिगल सिनेमाजवळ)
११२ – (चर्चगेट ते गेट वे ऑफ इंडिया)
२०३ – (जुहू बीच ते दहिसर ब्रिज)
२३१ – (सांताक्रूज रेल्वेस्थानक ते जुहू बसस्थानक)
२४७ – (बोरिवली स्थानक पश्चिम ते (रिंगरुट) गोराई पंपिंग स्टेशन, बोरिवली जेल, टेलिफोन एक्स्चेंज, बोरिवली बसस्थानक, पश्चिम)
२९४ – (बोरिवली पश्चिम ते गोराई ब्रिज, पेप्सी गार्डन, गोराई डेपो, महाराष्ट्र नगरमार्गे बोरिवली स्थानक पश्चिम (रिंगरुट)

आपली प्रतिक्रिया द्या